Showing posts with label sambhaji brigade. Show all posts
Showing posts with label sambhaji brigade. Show all posts

Tuesday, December 29, 2009

विभागीय शिक्षण परिषदेत अनेक प्रश्नांचा ऊहापोह
जालना, ८ डिसेंबर
डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने तिसरी मराठवाडा विभागीय शिक्षण परिषद जालना येथे झाली. शिक्षणाच्या संदर्भातील अनेक बाबी आणि प्रश्नांचा ऊहापोह या परिषदेत झाला. परिषदेचे प्रांत अध्यक्ष प्रताप पाटील भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विभागीय परिषदेचे उद्घाटन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते झाले. आमदार संतोष सांबरे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश टोपे, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष पुरुषोत्तम खेडकर, व्यंकटराव जाधव आदी यावेळी उपस्थित होते.
स्वागताध्यक्ष विनयकुमार कोठारी यांनी प्रारंभी स्वागत केले. प्रा. विठ्ठल भुसारे, प्रदीप सोळुंके, सतीश टोपे यांची मार्गदर्शनपर भाषणे या वेळी झाली. प्रा. रावसाहेब ढवळे आणि प्रा. गजानन जाधव यांनी पुरुषोत्तम खेडकर यांची प्रकट मुलाखत घेतली.
या वेळी विभागीय आणि जिल्हा पातळीवरील शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. ‘कथा कवितेला भेटली’ हा कार्यक्रम प्रा. जयराम खेडेकर आणि संजीवनी तडेगावकर यांनी सादर केला. राजकुमार तांगडे लिखित आणि दिग्दर्शित ‘आकडा’ हा नाटय़प्रयोग परिषदेत सायंकाळी सादर करण्यात आला. परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नेव्हल, सरचिटणीस शिवाजी जाधव त्याचप्रमाणे कल्याण बागले, रामेश्वर त्रिमुखे, अनिल धोरपडे, हरीष भोसले, अनंत मिटकरी, संतोष कातुरे यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले
‘तरुणांनी मोठी स्वप्ने पाहावीत’-प्रदीप सोळुंके
बीड, ५ नोव्हेंबर 2009
जन्मत: कोणीही मोठा नसतो तर प्रत्येकजण स्वत:च्या कर्तबगारीनेच मोठा होतो. त्यामुळे तरुणांनी स्वप्न मोठे पाहावेत, असे आवाहन प्रा. प्रदीप सोळुंके यांनी केले.बीड शहरातील तिसरे सकळ मराठा महासंमेलनात ‘तरुणांनो जागे व्हा’ या विषयावर प्रा. सोळुंके यांचे व्याख्यान झाले. यावेळी संयोजक अर्जुनराव जाहेर पाटील उपस्थित होते.प्रा. सोळुंके म्हणाले, तरुणांनी प्रयत्नवादी व्हावे. इच्छित ध्येय गाठण्यासाठी नेटाने प्रयत्न करायला हवेत. बदलत्या काळानुसार नवीन बदलांना स्वीकारले पाहिजे. जो काळानुसार बदलतो तोच टिकून राहतो, असे सांगताना तरुणांनी व्यवसायात कमीपणा न मानता करावा. शेतीबरोबर जोडधंदा केला तर प्रगती होईल. यासाठी संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. पालकांनीही संपत्तीवर लक्ष देण्याऐवजी संततीवर लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी ह.भ.प. आत्माराम जाधव यांनी ‘परिवर्तन चळवळीत संतांचे योगदान’ या विषयावर विचार मांडले.

महापुरुषांचे विचार आचरणात आणा -प्रदीप सोळुंके.

मिरजगाव, २१ फेब्रुवारी

महापुरुषांचे विचार आचरणात आणल्यास समाजाच्या प्रगतीस हातभार लागेल, असे प्रतिपादन प्रदीप सोळुंके यांनी केले.
शिवजयंतीनिमित्त येथे आयोजित व्याख्यानात सोळुंके बोलत होते. अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विजयकुमार ठुबे, संजय पवार, भाऊसाहेब जंजिरे, प्रा. सुभाष सूर्यवंशी, संजय घोडके, संपतराव बावडकर, संजय घोडके आदी उपस्थित होते. तत्पूर्वी शिवप्रतिमेची तब्बल पाच तास गावातून मिरवणूक काढण्यात आली. ‘स्नेहालय’च्या विद्यार्थ्यांचे झांज नृत्य मिरवणुकीत लक्षवेधी ठरले. संगमनेरच्या जाणता राजा ग्रूपने सादर केलेला शिवराज्याभिषेक देखावाही अप्रतिम होता.
सोळुंके यांनी संत तुकारामांच्या अभंगांचे दाखले देत अंधश्रद्धा, सामाजिक विषमता यावर प्रहार केले. ते म्हणाले की, तरुणांनी उद्योग क्षेत्रात उतरण्याची गरज आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने प्रत्येकाने काम करण्याची गरज आहे. श्रमाची लाज बाळगू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. दोन तास चाललेल्या व्याख्यानात सोळुंके यांनी उपस्थितांची मने जिंकली. सूत्रसंचालन निंबाळकर यांनी, तर लहू वतारे यांनी आभार मानले.

भांडारकर संस्थेवरील हल्ल्यातील आरोपींना सोडण्याची मागणी
14 Jan, 2004, 2216 hrs IST

पुणे : भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर हल्ला करण्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 72जणांना 23 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. त्या सर्वांची विनाअट सन्मानाने सुटका करण्यात यावी , अशी मागणी संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांनी बुधवारी घेतलेल्या सभेत केली.

भांडारकर संस्थेवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांना सकाळी अकरा वाजता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पी. के. कुलकणीर् यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयात गदीर् झाली होती. हल्लेखोरांपैकी 38 जणांनी खोटी नावे सांगितली असल्याचे सरकारी वकील बाळासाहेब खोपडे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. चोरीला गेलेला निजामाचा अल्बम , गणपतीची मूतीर् , आदिवासी भाल्यावरील वेष्टण आणि हल्ला करताना वापरलेल्या चार गाड्या जप्त करायच्या असल्याचे अॅड. खोपडे यांनी न्यायालयात सांगितले. या कार्यर्कत्यांचा दरोडा घालण्याचा उद्देश नव्हता , असा युक्तिवाद अॅड. विराज काकडे यांनी केला. त्यांना 23 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.

संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी आयोजित केलेल्या ' जिजाऊ अभिवादन सभे ' त लेखक जेम्स लेन यांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या पुस्तकावर बंदी घालून त्यांना अटक करावी ,अशी मागणी करणारे ठराव मंजूर करण्यात आले. तसेच , भांडारकर संस्थेवर हल्ला करणाऱ्यांवर लावलेले दरोड्याचे कलम मागे घ्यावे , अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

संभाजी ब्रिगेडच्या या सभेच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ऐतिहासिक शनिवारवाड्यावरही हल्ला करण्याचा इशारा ब्रिगेडकडून देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर लालमहाल आणि शनिवारवाड्याकडे येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आल्याने शहराच्या मध्यवस्तीतील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. शिवाजनगर गावठाणातील शिवाजी व्यायाम मंडळाच्या पटांगणात सभेचे आयोजन करण्यात आले होते. संभाजी ब्रिगेडशिवाय अखिल भारतीय मराठा महासंघ , शिवसंग्राम , फुले-शाहु-आंबेडकर विचारमंच ,महाराष्ट्र सेना , छत्रपती युवा मंच , शिवमहोत्सव समिती , बहुजन समाज पाटीर् , सत्यशोधक युवक संघटना आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.

भांडारकर संस्थेचे हल्ल्यात फार नुकसान झाले नसल्याचा दावा संभाजी ब्रिगेडचे गंगाधर ढमढेरे यांनी केला , तर संघटनेच्या कार्यर्कत्यांना गुंड म्हणून हिणवले जात असल्याबद्दल संघटनेचे प्रवक्ते प्रदीप सोळुंके यांनी खंत व्यक्त केली. सभेच्या शेवटी मंजूर करण्यात आलेल ठरावांत संभाजी ब्रिगेडच्या अटकेत असलेल्या कार्यर्कत्यांना विनाअट सन्मानाने सोडून लेन यांना अटक करावी. पुस्तकाच्या प्रती नष्ट करून चुकीची माहिती देण्याऱ्यांवर कारवाई करावी , आदींचा समावेश आहे.

यापुढे राष्ट्रपुरुषांच्या बदनामीचे प्रकार झाल्यास संघटना रस्त्यावर उतरणार असल्याचे सोळुंके यांनी वार्ताहरांना सांगितले. पुणे पालिकेने ' लालमहाल महोत्सव ' सुरू करून अंदाजपत्रकात तरतूद करण्याची मागणीही त्यांनी केली.